जलसेवक

गंगे च यमुनेचैव गोदावरी सरस्वती।
नर्मदे सिंधू कावेरी जलेसमिन संनिधीं कुरु:।।

ह्या श्लोकासोबत मला माझी आजी आठवते. ती आंघोळीच्या वेळी हा श्लोक म्हणायची. आपल्या देशातील सगळ्या नद्यांना आवाहन, त्यांची प्रार्थना करूनच आंघोळीला सुरवात करायची. नदी म्हणजेच पाणी हे जीवनाचं अमृत आहे. धरणी माते सोबतच ही माता आपल्यासाठी तितक्याच जवळची आणि महत्वाची आहे. गंगा माँ, नर्मदा मैय्या ही संस्कृती जपणारा आपला देश आहे. भगिरथाने अथक प्रयत्न, कष्ट करून पृथ्वीवर गंगा आणली असा पौराणिक काळामध्ये उल्लेख आहे. Civilization चा मुख्य स्रोत नदीच होती. Indus valley, Egypt ही civilizations नदीच्या प्रवाहासोबतच मोठी झाली. त्यामुळेच नदीचं म्हणजेच पाण्याचं जतन ही सध्याच्या काळात आवश्यक गोष्ट बनली आहे. माणूस जर पाण्याचा वापर सढळपणे करत असेल तर त्याचा संचय आणि संवर्धन करणे पण तेवढेच आवश्यक आहे. आमचा ‘जलसेवक’ ह्यात नक्कीच चांगली मदत करू शकेल अशी आशा आहे.

सोलापूर सारख्या दुष्काळी गावात लहानपण गेल्यामुळे पाणीटंचाई हा परवलीचा शब्द होता. त्यामुळे लहानपणापासून आर्थिक काटकसरीसोबतच पाण्याची काटकसर कशी करावी हे बाळकडू मिळालं. Water recycling अजून कळलेलं नव्हतं, म्हणून पाण्याचा वापरच कमी करायचा आम्ही प्रयत्न करायचो. डाळ-तांदूळ, भाज्या धुतलेलं पाणी झाडांना घालणे, थोडयाशा पाण्यात खरकटी भांडी धुणे अशा प्रकारे पाणीबचत आम्ही करत होतो.

तर आता ‘जलसेवक’ तर्फे आम्ही water recycling हा concept आणत आहोत; to be precise,”grey water recycling”  अशी आमची theme आहे. Grey water म्हणजे human waste नसलेलं सांडपाणी. वॉशिंग मशीन लावणे, वॉश बेसिन वापरणे, आंघोळ इत्यादी क्रियांमधून निर्माण झालेले grey water एकत्र जमा करून क्लोरिन अथवा तत्सम पदार्थ वापरून त्याचे निर्जंतुकीकरण करणे व तेच पाणी पुन्हा toilet flush साठी वापरणे हा आमचा मुख्य हेतू आहे.

आपल्या दिवसभराच्या पाणीवापरापैकी ३० टक्के पाणी आपण toilet flush साठी वापरतो. पिण्यास योग्य पाणी toilet flush साठी वापरणे हे टाळण्याजोगे आहे. ‘जलसेवक’ तर्फे शुध्द केलेलं पाणी flush साठी वापरून आपण ३०% पाणीबचत, पर्यावरण हानी, स्वछता या गोष्टी साध्य करू शकतो. आपल्या Bathroom मधे थोडेफार बदल करून व ‘जलसेवक’ यंत्रणा बसवून आपण सहजपणे जल संवर्धन करू शकतो. जरूर आहे ती असा वेगळा विचार करण्याची आणि एक पाऊल पुढे टाकण्याची.

प्रत्येक जल उपभोक्त्याने जलसेवक होण्याची वेळ आलेली आहे. वसुंधरेच्या संवर्धनासाठी हा ‘जलसेवक’ आपला खारीचा वाटा ह्या पद्धतीने देऊ इच्छितोय! अधिक माहितीसाठी www.jalsevak.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

अनघा कुलकर्णी

(लेखिकेसोबत sauanagha@gmail.com ह्या पत्त्यावर संपर्क साधता येईल.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *